Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

‘राघव आणि परिणीतीचे मनापासून अभिनंदन’, AAP खासदाराने केली नात्याची पुष्टी

पुणे : परिणीतीचे नाव आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार राघव चढ्ढासोबत जोडले जात आहे. परिणीती आणि राघव मुंबईमध्ये एकत्र स्पॉट झाल्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या समोर आल्या. दरम्यान, आता आप खासदार संजीव अरोरा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे या दोघांच्या नात्याची पुष्टी केली आहे.

आप खासदाराने केले अभिनंदन


राघव चढ्ढासोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर परिणीती चोप्राने आतापर्यंत मौन बाळगले आहे. तसेच, राघव चढ्ढानेही मीडियासमोर परिणीतीबाबत बोलण्यास नकार दिला आहे. अशातच चाहते त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत. यादरम्यान, आप खासदार संजीव अरोरा यांनी या दोघांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. अरोरा यांनी ट्विटरवरुन दोघांचे अभिनंदन केले आहे.

संजीव अरोरा यांनी आपल्या ट्विटमध्ये परिणीती आणि राघव चढ्ढा यांचा फोटो शेअर केला आहे. दोघांच्या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे मनापासून अभिनंदन करतो. मला आशा आहे की, दोघांचा सहवास प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. माझ्या शुभेच्छा!’

नात्याची चर्चा कशी सुरू झाली?


परिणीती चोप्रा नुकतीच राघव चढ्ढासोबत मुंबईत स्पॉट झाली होती. दोघेही एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. मात्र, परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी अद्याप या वृत्तांवर अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. राघव चढ्ढा यांना परिणीतीबद्दल विचारण्यात आले असता, तुम्ही मला राजकारणाचे प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल प्रश्न विचारू नका, असे ते म्हणाले.

परिणीती अभिनयात पारंगत


राघव चढ्ढा आणि परिणीतीबद्दल बोलायचे झाले तर दोघांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आहे. दोघेही अभ्यासात खूप हुशार. मात्र, परिणीती चोप्राने तिचे करिअर चित्रपटांमध्ये केले. बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. तिने नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. आता ती ‘चमकीला’ आणि ‘कॅप्सूल गिल’मध्ये दिसणार आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles