Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे… डॉक्टर एकनाथ शिंदे..?

मुंबई : आपल्या देशाला तक्षशिला, नालंदा, सोमपुरा यांसारख्या जागतिक दर्जाच्या समृद्ध विद्यापीठांचा इतिहास आहे.हा वारसा आताच्या विद्यापीठांनी पुढे न्यायला हवा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी नेरूळ येथे केले. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, तर लाेकमत मीडियाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांना समाजसेवा, माध्यमक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती विजय पाटील यांच्या हस्ते राज्यपालांच्या उपस्थितीत डी. लिट या मानद उपाधीने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी मुख्यमंंत्री शिंदे आणि दर्डा यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून दोघांचे डी. लिट पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतज्ञतापूर्वक भाषणात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे आभार मानले. ते म्हणाले, डी. लिट हा मोठा सन्मान आहे. तो पाहण्यासाठी वडील संभाजी शिंदेंसह धर्मपत्नी आणि मुलगा खा. श्रीकांत शिंदे आवर्जून उपस्थित आहेत. ही पदवी मी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुपूर्द करतो. आताही मुख्यमंत्री असलो तरी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. श्रीमंतांच्या यादीत माझे नाव आले नाही, तरी चालेल; पण माणुसकीच्या यादीत ते अग्रभागी असेल, कारण मी माणुसकीने श्रीमंत माणूस आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles