Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपोलिस व नागरिक मित्र संघटनेतर्फे आरोग्य सेवा कॅम्प

पोलिस व नागरिक मित्र संघटनेतर्फे आरोग्य सेवा कॅम्प

पिंपरी चिंचवड : निगडी येथे आषाढी पायी वारी 2022 निमित्त मोफत आरोग्य सेवा कॅम्प घेण्यात आला. याचे उद्घाटन जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथियान यांनी केले. या प्रसंगी वेग वेगळ्या हॉस्पिटल मधून मंगळवार 21 जून ला मोफत आरोग्य सेवा डॉक्टर टीम उपस्थित होत्या. 

धनश्री हॉस्पिटल चे डॉ.अभिनंदन नवले, डॉ. बोधिमाला वानखेडे, स्टर्लिंग हॉस्पिटल चे डॉ. कृष्णा जामदार, डॉ.मृणाल जगताप, डॉ.पूजा मंत्री, डॉ. निकिता कुरई, वेदांत हॉस्पिटलचे डॉ.निखिल सोनवणे, डॉ.पूजा भदाणे, निदान क्लिनिकचे डॉ.निलेश आधिकारी, पोलिस व नागरिक संघटनेतर्फे संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष अशोक तनपुरे यांच्या हस्ते, सूर्यकांत मुथियान व सर्व डॉक्टर टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बंदोबस्तासाठी निगडी पोलिस ठाणे यांच्या अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांच्या आदेशाने नेमून दिलेल्या पॉईंट्स वरती, वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आपल्या संघटनेचे पोलिस व नागरिक मित्र सहभागी झाले. मोफत आरोग्य सेवा देत असताना, अनेक पोलिस व नागरिक मित्र यांनी वारकऱ्यांचे पाय व हात मसाज करण्याचे सेवाकार्य केले. 

यावेळी कै.तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र संघटनेचे, घरकुल विभाग, संभाजीनगर विभाग, पिंपरी विभाग, चिंचवड विभाग, निगडी प्राधिकरण विभाग, चिखली विभाग, मोशी विभाग, हिंजवडी विभाग, देहू रोड विभाग, तळवडे विभाग, भोसरी विभाग, पुणे शहर विभाग, आशा अनेक विभागातून बहुसंख्य पोलीस व नागरिक मित्र उपस्थित होते. 

आपल्या मोफत आरोग्य सेवा या ठिकाणी विशेष भेट निगडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे दिली. तसेच पानसे पानसे ऑटो कॉप कर्पोरेशन लि चाकण पुणे कंपनीचे एमडी पानसे यांनी औषधे आणि वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 15 हजार रुपयांची मदत सी एस आर फंडातून दिली. तसेच उपस्थित सर्व डॉक्टर्स व त्यांचे सहभागी हॉस्पिटल यांनी सेवा दिल्यामुळे मोफत आरोग्य सेवा कॅम्प उत्तम रीतीने पार पडले. तसेच सेवा कार्य करण्यासाठी लागणारे साहित्य, यासाठी योगदान दिले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव काळसेकर, प्रास्ताविक अशोक तनपुरे यांनी केले तर संयोजन विजयकुमार आब्बड, नितीन मोरे, महिला अध्यक्ष अमृता वैद्य, मोशी विभाग प्रमुख स्मिता सस्ते, कुणाल बडीगेर व टीम या सर्वांनी या सेवा कार्यात उत्तम योगदान दिले. 

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय