Monday, December 30, 2024
Homeजिल्हाबार्शीत 'भाजप हटाव, देश बचाव' मोर्चा

बार्शीत ‘भाजप हटाव, देश बचाव’ मोर्चा

बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिल व आयटक यांच्या वतीने “भाजप हटाव देश बचाव” ही मागणी घेऊन तहसीलदार यांचे कार्यालयावर आज दिनांक 15 मे 2023 रोजी भगवंत मैदान येथून कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

कॉम्रेड प्रा.तानाजी ठोंबरे म्हणाले “देशात भाजपाने सर्व श्रमजीवी वर्गाला उध्वस्त करण्याचे काम भाजपने आखले आहे, संविधान मूल्य संपवणे, शेतकरी कामगार विरोधी धोरण आखणे, महागाई -बेरोजगारी, सामाजिक तेढ वाढवने, अनैतिक पद्धतीने सत्ता काबीज केल्या आहेत, अल्पसंख्यांक दलित यांच्यावरील हल्ले वाढवले, खेळाडूंचे लैंगिक शोषण करणे, लेखक – विचारवंत -साहित्यिक- कलाकार यांना छळणे हे काम केले आहे त्यामूळे जनताच भाजपला हटवेल.”

यावेळी नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांनी निवेदन स्वीकारले, मोर्चाचे निवेदन कॉम्रेड प्रांजली कदम, नागेश मिरगणे, शितल करडे यांनी दिले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ, बांधकाम कामगार संघटना, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय संघटना, कंत्राटी नर्सेस संघटनाचे कॉम्रेड एबी कुलकर्णी, कॉ. डॉ.प्रवीण मस्तुद, अनिरुद्ध नखाते, लहू आगलावे, धनाजी पवार, भारत भोसले, आनंद गुरव, शौकत शेख, भारती मस्तुद, तानाजी बागल, संगीता गुंड, सिद्धेश्वर कांबळे, सतीश गायकवाड, मुबारक मुलाणी, रशीद इनामदार, संपत घोडे, सुवर्णा नेंदणे, सरस्वती उंबरे, स्नेहलता देशपांडे, अलका स्वामी, उज्वला काटे, नानासाहेब ठाकरे, बालाजी ठाकरे, राजू ढेंबरे, दशरथ भालके, राम कोळी, जयराम सराफ, जयवंता अमले आदी उपस्थित होते.

हे ही वाचा :

दीपक बोरगावे यांना ‘रत्नाकर काव्य पुरस्कार’ जाहीर

व्हिडिओ: दिल्ली मेट्रो मध्ये जोडप्याचे व्हायरल लीप लॉक पाहिले का ?

देशातील लोकशाहीची वेगाने अध:पतनाच्या दिशेने वाटचाल – डॉ.विश्वंभर चौधरी

नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती

High Court : उच्च न्यायालयात 1778 पदांसाठी भरती

लग्नातील जेवणाच्या पंगतीत वाढप्यावर चाकूहल्ला कारण एकूण थक्क व्हाल

२२ दिवसांनंतर आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंचा संयम सुटला; ब्रिजभूषण सिंहांविरोधात उचललं ‘हे’ मोठं पाऊल

संबंधित लेख

लोकप्रिय