Sunday, June 30, 2024
Homeआंतरराष्ट्रीयHajj Pilgrims : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

Hajj Pilgrims : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

Hajj Pilgrims : सौदी अरेबियामधील (Saudi Arabia) मक्केला हज यात्रेसाठी गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. 12 जून ते 19 जून या कालावधीत चाललेल्या हज यात्रेत आतापर्यंत एकूण 550 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे. (Hajj Pilgrims)

इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेला (Hajj Pilgrims) अनन्यसाधारण महत्त्व आहे. हज यात्रा ही जगातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा आहे. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हजला जायला हवे असे म्हटले जाते. त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लीम हज यात्रेसाठी मक्केला जातात. यंदाही जगभरातून लाखो लोक हज यात्रेसाठी सौदी अरेबियात आले आहेत. परंतु, यंदाच्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे यात्रेकरूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात हजसाठी गेलेल्या 550 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. 

Hajj Pilgrims

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, मृतांमध्ये 323 नागरिक इजिप्शियन आहेत, तर 60 जॉर्डनचे आहेत. याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. 2 अरब राजनयिकांनी एएफपीला सांगितले की बहुतेक मृत्यू उष्णतेमुळे झालेल्या आजारामुळे झाले आहेत. 17 जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये तापमान 51.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय