पुणे : आगामी पाच दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता असून, सप्टेंबरची सुरुवात पावसाने होत आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. देशात उत्तर प्रदेश व राजस्थान वगळता उर्वरित सर्वत्र हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात, तर मध्य भारतात पुन्हा पश्चिमी वार्याची ताकद वाढल्याने पाऊस पुन्हा सुरू होत आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस होईल. उशिरा सुरू झालेला पाऊस जुलै पर्यंत पडला. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली.
वाऱ्याची दिशा बदलली असल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे. हवामान बदलाचा प्रभाव सर्वत्र जाणून येत आहे. ऑक्टोबर पर्यंत मोठा पाऊस न पडल्यास राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागेल अशी चिंता सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत आहे.
---Advertisement---
---Advertisement---
गारवा वाढणार..राज्यात पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता
---Advertisement---
- Advertisement -