Gurucharan Singh : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सोनी सबवरील लोकप्रिय मालिकेतील एक अभिनेता अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर 25 दिवसांनंतर हा अभिनेता घरी परतला आहे. हा अभिनेता म्हणजे रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग.
अभिनेता गुरुचरण सिंग यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतून अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मात्र अभिनेता गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी संध्याकाळी दिल्लीहून मुंबईसाठी निघाला होता. पण तो मुंबईत पोहोचलाच नाही. त्यानंतर त्याच्याशी कोणताच संपर्क झाला नाही. या घटनेच्या चार दिवसांनंतर त्याच्या कुटुंबाने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर तो अभिनेता 25 दिवसांनंतर घरी परतला आहे. मात्र आता एवढ्या दिवस अभिनेता गुरुचरण सिंग नेमका कुठे होता, काय करत होता? याची माहिती समोर आली आहे.
कुठे होता Gurucharan Singh
दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो. बरीच दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. असा खुलासा स्वतः गुरुचरण यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये काही दिवस थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला, असं गुरुचरण सिंग यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम
ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान
पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर
मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला
शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर