पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२२/२३ परीक्षेत प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, काळभोरनगर, चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. सालाबाद प्रमाणे या वर्षीही प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
विज्ञान शाखेतून पवार सिद्धी सतीश ९१ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, सराफ सिमरन उदय ९०.६७ टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर गोंघाडे अथर्व अविनाश ९० टक्के गुण प्राप्त करुन तृतीय आले.
वाणिज्य शाखेतून शेवाळे विशाल सागर ९४ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, शेख फरहिन फिरोझ ९३.८३ टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर माळी साहिल राजेंद्र ९१.८७ गुण प्राप्त करुन तृतीय आले.
कला शाखेतून पवार श्रेया राहूल ९४ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, चौहान महक रुपकुमार ९१.३३ टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर आचारी अरुणकुमार शामकुमार ९० टक्के गुण प्राप्त करुन तृतीय आले. कु.शहा आयुषी रविंद्र हिने अकाउंट्सी या विषयात १०० गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.