हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी या नामांकित कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.
एस. एम. जोशी कॉलेजमधील शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी याच कॉलेजमधील मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत कर्नल अंकुर सोरेक, लेफ्टनंट धीरज भीमवाल, आय.क़्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. किशोर काकडे, मराठी विभागप्रमुख डॉ.राजेंद्र ठाकरे, प्रा.शुभम तांगडे हे उपस्थित होते.