Thursday, September 19, 2024
HomeNewsसर्वसामान्यांना आनंदाची बातमी! पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होणार?

सर्वसामान्यांना आनंदाची बातमी! पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होणार?

मागील अनेक महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाहीय. मागील काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण दिसून आली. तरी देशील सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झालेला नाहीय.मात्र, आता यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कारण, जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. अमेरिकन ऑइल डब्ल्यूटीआयच्या किंमतीत 5.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. किंमत प्रति बॅरल $3.63 ने कमी होऊन प्रति बॅरल $67.70 वर आली आहे. दोन्ही कच्च्या तेलाच्या किमतींचा दर हा डिसेंबर 2021 च्या खालच्या पातळीवर आला आहे.

याचा परिणाम भारतीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. किंमत 346 रुपयांनी कमी होऊन 5,637 रुपये प्रति बॅरलवर आली आहे. ट्रेडिंग सत्रात कच्च्या तेलाचा भाव 5,617 रुपयांवर गेला होता. बाजार सुरु होताना हा दर 5,968 रुपयांवर होता.

क्रूड ऑईलचे दर 5,500 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे भारतात पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या वाहनधारकांना हा मोठा दिलासा असेल.

संबंधित लेख

लोकप्रिय