Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बेरोजगारांना सुवर्णसंधी; कौशल्य विकास रोजगार केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळावा.

---Advertisement---

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘ऑनलाईन व्हर्च्युअल जॉब फेअर’ २९ जून ते १ जुलै पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. 

---Advertisement---

यामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, बँकऑफिस, सेल्स ऑफिसर, डाटा ऑपरेटर, विमा सल्लागार, एजन्सी मॅनेजर, टेलीकॉलर, फिल्ड सेल्स ऑफिसर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, मॅकॅनिकल/इलेक्ट्रीशयन इंजिनिअर, सीएनसी, व्हीएमसी, फौन्ड्री, हेल्पर यासाठी ८ वी ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई.मॅकॅनिकल/ईॲन्डटीसी/इलेक्ट्रीकल अशा शैक्षणिक पात्रतेची कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित १० आस्थापनांची ४४१ विविध रिक्तपदांद्वारे मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार दिनांक २९ जून २०२० ते १ जुलै २०२० त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएम अलर्ट द्वारे कळविण्यात येणार आहे व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा.

 कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात आवहान करण्यात आले आहे की, २९ जून २०२० पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून रोजगार मेळावा संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 0231-2545677 या दुरूध्वनी क्रमांवार संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  ज.बा.करीम यांनी केले आहे. 


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles