Gold rates : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. या व्यापारिक आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 2,186 रुपयांनी घसरला आहे, तर चांदीचा भावही 3,111 रुपये प्रति किलोग्रॅमने घसरला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड नोंदवला. सोन्याने 75 हजारांटा टप्पा ओलांडला, तर चांदी थेट 96 हजारांच्या घरात पोहचली होती. मात्र आता किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (21 मे ते 24 मे) 24 कॅरेट सोन्याचा दर 74,214 रुपये होता, जो शुक्रवारपर्यंत 72,028 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. आहे. त्याच वेळी, 999 शुद्ध चांदीची किंमत 92,873 रुपयांवरून 89,762 रुपये प्रति किलोवर घसरली आहे.
मुंबई आणि पुण्यातील दर Gold rates
सध्या मुंबई मध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,५४२ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,५०० प्रति १० ग्रॅम आहे. तसेच पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५४२ रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५०० रुपये आहे.
हे लक्षात घेण्याजोगे आहे की IBJA ने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किंमतीबद्दल माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
असे जाणून घ्या बाजार भाव
बाजार भाव माहिती करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. या सोबतच तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
हेही वाचा :
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती