घोडेगाव : साहित्यदीप वाचन चळवळ, हा गट आंबेगाव तालुक्यातील गावागावात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या गटाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 10 गावात ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत.
नुकतेच साहित्यदीप वाचन चळवळ गटाच्या माध्यमातून गंगापूर खुर्द येथील गाडेकर वस्ती येथे सुमारे 141 पुस्तके तर राजपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी गाडेवाडी येथे सुमारे 100 पुस्तके भेट देण्यात आली. या दोन्ही ठिकाणच्या युवकांनी, ही पुस्तके घेऊन आपल्या वाडीमध्ये नवीन ग्रंथालये सुरू केली आहेत.
हे वाचा ! दलित साहित्याची कोंडी आदिवासी साहित्य प्रवाहाने फोडली – डॉ. श्रीपाल सबनीस
गाडेकरवाडी येथील युवकांना शहिद राजगुरु ग्रंथालयाचे ग्रंथपाल अशोक जोशी व सामाजिक कार्यकर्त्या अंकिता ढमढेरे यांच्या हस्ते ही पुस्तके देण्यात आली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक पेकारी व राजू घोडे उपस्थित होते, तर गाडेवाडी येथील युवकांना पुस्तके डॉ.अमोल वाघमारे, मुक्त पत्रकार नवनाथ मोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
या दोन्ही नवीन ग्रंथालयांना, साहित्यदीप वाचन चळवळीचे महेश जगताप, रवींद्र वायाळ, विजय केंगले व डॉ.अमोल वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या.
सावधान ! महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा उद्रेक, आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा