Sunday, June 8, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Ghodegaon : विविध मागण्यांसाठी एसएफआयचे घोडेगाव प्रकल्प कार्यालय येथे बेमुदत आंदोलन सुरू

Ghodegaon : राज्यभरातील आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सातत्याने समोर येत आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. आदिवासी आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचन पद्धती सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. सेंट्रल किचनच्या जेवणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे, जेवणामध्ये अळ्या आणि फुगे आढळत आहेत, अशा विविध समस्याच्या विरोधात स्टुुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने घोडेगाव प्रकल्प कार्यालय येथे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

---Advertisement---

घोडेगाव प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमध्ये सर्व विषय शिक्षक उपलब्ध करावेत आणि कायमस्वरूपी मुख्याध्यापक व अधीक्षक यांची नेमणूक करावी, अशी मागणी एसएफआयने केली आहे.

एसएफआयच्या मागण्या (Ghodegaon) :

1. वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा.

---Advertisement---

2. घोडेगाव प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी ७००० जागा वाढविण्यात याव्यात.

3. सेंट्रल किचन पद्धती बंद करून दोषींवर कारवाई करावी.

4. वसतिगृहातील जेवणाची डीबीटी बंद करून मेस पद्धती सुरु करावी.

5. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये ४ वर्षांचा प्रवेश देण्यात यावा.

6. मुलभूत सुविधांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत.

7. मंचर येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा.

8. जुन्नर येथील वसतिगृहासाठी रस्ता उपलब्ध करावा.

9. सर्व विषय शिक्षक आणि कायमस्वरूपी मुख्याध्यापक व अधीक्षक नेमणूक करावी.

एसएफआयच्या या मागण्या तात्काळ पूर्ण केल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

---Advertisement---

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles