Saturday, March 15, 2025

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वेरूळ लेणीत; अद्वितीय सौंदर्य पाहून हरखून गेल्या

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांनी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणीला आज सकाळी भेट दिली.लेणी सौंदर्य पाहून हिलरी हरखून गेल्या होत्या. त्यांच्या सोबत मोजकेच व्यक्ती होते. आज दिवसभर त्या वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात पर्यटन करणार आहेत.

काळ्या रंगाचा कोट आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस…गाॅगल लावलेला…चेहऱ्यावर स्मितहास्य आणि उपस्थितांना भारतीय पद्धतीने नमस्कार करून आणि हात उंचावून अभिवादन करून बलाढ्य अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांनी मंगळवारी औरंगाबादेत पहिले पाऊल टाकले. अहमदाबादहून विशेष विमानाने दुपारी ३:३५ वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. अमेरिकेच्या दूतावासाची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलिसांचा फौजफाटा आणि १२ वाहनांच्या ताफ्यासह त्या विमानतळावरून अवघ्या १३ मिनिटांत खुलताबादच्या दिशेने रवाना झाल्या. मंगळवारी त्यांचा खुलताबाद येथील ध्यान फार्म येथे मुक्काम केला.

हिलरी क्लिंटन दोन दिवस गुजरातेमध्ये होत्या. अहमदाबादहून त्या मंगळवारी औरंगाबादला दाखल झाल्या. शहाजतपूर (ता. खुलताबाद) येथील ध्यान फार्म येथे त्यांचा मुक्काम असेल. येथे ध्यान साधनेत त्या सहभागी होतील. बुधवारी वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट देतील.

हिलरी यांच्या आगमनापूर्वी एक दिवस आधीच अमेरिकेच्या दूतावासाचे सुरक्षा अधिकारी विमानतळावर आले. ते विमानतळावर सुरक्षेची खबरदारी घेत होते. मंगळवारी दुपारी आगमनापूर्वी अमेरिका दूतावासाचे ४ पुरुष आणि दोन महिला सुरक्षा अधिकारी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करीत होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles