Thursday, March 13, 2025

मोठी बातमी : कुंभमेळाव्यात अग्नितांडव, 30-35 तंबूंचे मोठे नुकसान

Fire At KumbhMela in Prayagraj : महाकुंभ 2025 च्या शास्त्री ब्रिज सेक्टर-19 कॅम्पमध्ये रविवारी सकाळी मोठी आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या भागात तात्पुरते तंबू उभारण्यात आले होते, जिथे महाकुंभाला आलेले भाविक आणि बाबा राहतात. आगीचे कारण गॅस सिलेंडरचा स्फोट असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

30-35 तंबूंचे मोठे नुकसान (Fire in KumbhMela)

प्राथमिक माहितीनुसार, या आगीत 30 ते 35 तंबूंना नुकसान झाले आहे. तंबूंमध्ये राहणाऱ्या लोकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले असून, सुदैवाने जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, आगीमुळे संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत, ज्यामुळे घबराट निर्माण झाली आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणल्याचे समजते. प्रशासनाने परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

आगीच्या घटनेमुळे महाकुंभ परिसरात काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने भाविकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. या आगीत झालेल्या नुकसानाचा आढावा प्रशासन घेत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !

मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक

इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा

भारतीय स्टेट बँक अंतर्गत 600 पदांची भरती, पात्रता – पदवी

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार

Related Articles

- Advertisement -

Latest Articles