Thursday, February 13, 2025

PCMC : धर्मांध शक्ती विरोधात वैचारिक लढा आणि प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे – डॉ. किशोर खिल्लारे

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे पिंपरी चिंचवड शहर अधिवेशन दि.१६ जानेवारी रोजी पार पडले. या अधिवेशनासाठी एकूण २५ प्रतिनिधी उपस्थित होते शहीद स्तंभाला अभिवादन करून ज्येष्ठ कॉम्रेड बाळासाहेब गस्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. (PCMC)

कॉम्रेड सचिन देसाई यांनी शोक प्रस्ताव मांडला अधिवेशनाची प्रस्तावना तालुका सचिव कॉम्रेड सतीश नायर यांनी केली. या अधिवेशनासाठी जिल्हा कमिटी सदस्य सतिश नायर , डाॅ किशोर खिल्लारे, काॅ. अपर्णा दराडे हे उपस्थित होते. (PCMC)

डॉ. किशोर खिल्लारे यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले व काॅ. सतीश नायर यांनी मागील तीन वर्षाचा अहवाल मांडला या अहवालावर उपस्थित प्रतिनिधींपैकी पाच जणांनी चर्चेत सहभाग नोंदवला.

चर्चेअंती अहवालावर एक मत होऊन अहवाल एकमताने मंजूर करण्यात आला,पुढील तीन वर्षासाठी नऊ सदस्य समिती निवडण्यात आली व पिंपरी चिंचवड शहर सचिव म्हणून कॉम्रेड सचिन देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनासाठी जिल्हा सेक्रेटरी गणेश दराडे हेही उपस्थित होते, त्यानी अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात पुढील तीन वर्षासाठी निवडण्यात आलेल्या समितीला शुभेच्छा देऊन पुढील तीन वर्षात स्थानिक प्रश्नांना घेऊन पक्षाने रस्त्यावर उतरावे त्याचबरोबर पक्षाच्या सर्व जन संघटनांची जाणीवपूर्वी त्या बांधणी करावी त्यातून पक्षाची बांधणी करावी असा सल्ला त्यांनी आपल्या भाषणात दिला अधिवेशनाचे संयोजन नियोजन अमीन शेख व देवीदास जाधव यांनी केले.

या अधिवेशनात माकप पुणे जिल्हा समिती सदस्य डॉ. किशोर खिल्लारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून उजव्या धर्मांध शक्ती समाजामध्ये द्वेषभावना पसरवण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे उपेक्षित, वंचित आणि श्रमिक समाजाच्या एकजुटीचा कामगार वर्गीय विचार मागे पडला आहे. समाजाची अवस्था तडा गेलेल्या आरशासारखी झाली आहे.

समाजवादी विचारसरणीचे प्रबोधन आवश्यक (PCMC)

एक राष्ट्र आणि एकात्मता असलेला आपला भारत देश जाती धर्मात विभागला जाऊ नये, हे राष्ट्र कामगार कष्टकऱ्यांच्या घामातून आणि प्रचंड बुधिमत्तेतून महासत्ता बनत आहे.
या देशातील कामगार कष्टकऱ्यांच्या रोजच्या जगण्यातील पिळवणूक नष्ट करण्यासाठी योग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. विविध जाती, धर्म, आणि संस्कृतींमध्ये सुसंवाद साधणारी तसेच स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही मूल्ये असलेल्या समाजवादी विचारसरणीचे समाजात प्रबोधन करणे आवश्यक आहे.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अत्यंत महत्वाच्या आहेत.शहराचा व गावाचा विकास व प्रगती त्यावर अवलंबून आहे. सजग व सुजाण नागरिकांनी यासाठी पुढाकार घेवून जनवादी प्रतिनिधित्व ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेले पाहिजेत तरच जनतेचे मार्गी लागतील. असे डाॅ किशोर खिल्लारे म्हणाले.

या अधिवेशनात कॉम्रेड सचिन देसाई यांचेसह सतीश नायर, अमिन शेख, जयप्रकाश, जयश्री साळोखे, देविदास जाधव, एस के पोनाप्पन, हरी कुमार, अविनाश लाटकर, बाळासाहेब घस्ते, अनिल कुमार झा, वीरभद्र स्वामी यांची माकप पिंपरी चिंचवड शहर समितीवर निवड करण्यात आली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

Related Articles

- Advertisement -

Latest Articles