Monday, February 3, 2025

नोकरदारांसाठी खूशखबर, अर्थसंकल्पात आयकर संदर्भात मोठी घोषणा

Union Budget 2025 Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी मोदी सरकार 03 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या अनेक अपेक्षा होत्या, विशेषतः आयकर सवलतीसंदर्भात मोठी घोषणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती.

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल. हे नवीन कायदे 1961 च्या आयकर कायद्याची जागा घेतील. विशेष बाब म्हणजे, नव्या करप्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी करसवलतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना व्याजावर मिळणाऱ्या करसवलतीची मर्यादा ₹50,000 वरून ₹1,00,000 करण्यात आली आहे. तसेच, टीडीएस आणि टीसीएसच्या नियमांमध्ये सुलभता आणण्यात येणार आहे.

अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, नवीन आयकर विधेयक कररचना सुधारण्यावर भर देणार असून, यात करस्लॅबमध्ये मोठे बदल होणार नाहीत. 2020 मध्ये सरकारने नवीन कर प्रणाली आणली होती, मात्र त्यावेळी लोकांनी तिला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. परंतु आज 65% करदाते नवीन कर प्रणाली स्वीकारत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

नवीन करस्लॅब (Union Budget):

0 ते 4 लाख: कोणताही कर नाही
4 ते 8 लाख: 5%
8 ते 12 लाख: 10%
12 ते 16 लाख: 15%
16 ते 20 लाख: 20%
20 ते 24 लाख: 25%
24 लाखांवरील उत्पन्न: 30%

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या

धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

मोठी बातमी : 40 लाख द्या, MPSC ची प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, राज्यात खळबळ

घर घेणाऱ्या इच्छुकांसाठी धक्का! १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात १० टक्के वाढ

संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

Related Articles

- Advertisement -

Latest Articles