जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादामुळे १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मौलिक नावाच्या मुलावर काही मित्रांनी स्टंपने हल्ला केला होता, ज्यामुळे गंभीर जखमी होऊन चार दिवसांनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Jodhpur)
मिळालेल्या माहितीनुसार, मौलिक मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना इतर काही मुलेही मैदानावर आली आणि त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरला. मात्र, मौलिक आणि त्याच्या मित्रांनी त्यांना खेळू देण्यास नकार दिला. यावरून वाद वाढत गेला आणि काही मुलांनी आक्रमक होत मौलिकवर प्लॅस्टिकच्या स्टंपने प्रहार केले. वारंवार डोक्यावर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला.
घरात बेशुद्ध अवस्थेत सापडला (Jodhpur)
घटनेनंतर मौलिकच्या आईला याची माहिती मिळताच ती त्याला घरी घेऊन गेली. मात्र, घरी गेल्यानंतर तो थकून झोपला आणि काही वेळाने बेशुद्ध झाला. त्याच्या तोंडाला फेस येत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्वरित त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मथुरादास माथुर रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं
या घटनेनंतर मौलिकच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले. तिन्ही आरोपी सातवीत शिकत असून, न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.


हे ही वाचा :
मोठी बातमी : 40 लाख द्या, MPSC ची प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, राज्यात खळबळ
घर घेणाऱ्या इच्छुकांसाठी धक्का! १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात १० टक्के वाढ
संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत
महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर
चीनच्या नव्या चॅटबॉटमुळे जगभरात खळबळ, अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी
गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार