Friday, December 27, 2024
Homeराजकारणशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार

पुणे : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात तक्रार दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील तफावतींबाबत तक्रार करण्यात आली आहे. ॲड. समीर शेख यांच्यातर्फे अतिरिक्त न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अभिजित खेडकर व डॉ. अभिषेक हरिदास यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या सुनावणीवेळी ही तक्रार ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात येईल.

शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ साली एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या सोबत मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे याचिकेत नमूद केलंय.

शिंदे त्यांनी २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात एक लाख ८९ हजार ७५० रुपयात बोलेरो जीप खरेदी केल्याचे नमूद केले आहे. त्यासोबत २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात हीच बोलेरो गाडी सहा लाख ९६ हजार ३७० रुपयाला घेतल्याची नमूद केली. त्याबरोबरच टेम्पो, इनोव्हा या वाहनांची खरेदी किमती, तसेच, व्यापारी गाळा, शेतजमीन यांच्या किंमतीच्या माहितीत फरक असल्याचा दावा तक्रारदारांनी केला.

संबंधित लेख

लोकप्रिय