Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशमधून नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिला चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलने थप्पड लगावल्याचे प्रकरण समोर आले असून यासंदर्भात त्या महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.
शिवाय, तिच्या या कृतीनंतर एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात येत आहे. कंगना रणौत ही चंदिगढ विमानतळावर आल्यानंतर या कुलविंदर कौर नावाच्या महिला कॉन्स्टेबलने तिला थप्पड लगावली.
या घटनेनंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती महिला म्हणते की, कंगनाने केलेल्या ट्विटचा राग म्हणून तिने हे कृत्य केले आहे. कंगना रणौतने २०२१ मध्ये ट्विट करताना शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला १०० रुपये देऊन आणल्या जातात असे विधान केले होते. नंतर ते ट्विट तिने डीलिट केले. पण त्याचा राग मनात ठेवून या कॉन्स्टेबलने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.
Kangana Ranaut ने आपली भूमिका मांडली
याबाबत कंगना रणौतनेही व्हिडिओ करून आपली भूमिका मांडली. आपल्यावर हा हल्ला झाल्याचे ती म्हणाली. आपल्या चेहऱ्यावर तिने मारले असे कंगनाने सांगितले. आपण पंजाबमधील खलिस्तानी चळवळीच्या विरोधात असून त्यासंदर्भात कठोर पावले उचलली गेली पाहिजेत, असेही ती म्हणाली.
या महिला कॉन्स्टेबलने २०२१ च्या ट्विटवर आताच हा राग का व्यक्त केला? यामागे आणखी कोणती कारणे आहेत, हे सगळे आता चौकशीतून समोर येणार आहे. कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवत विक्रमाादित्य सिंग यांना पराभूत केले. तिचा हा मोठा विजय मानला जात आहे.
हेही वाचा :
एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…
फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती
बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार