Thursday, February 6, 2025

प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता, परिसरात खळबळ

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या कालपासून बेपत्ता झाली आहे. २४ तास उलटले असून अद्याप तिचा शोध लागला नसल्याने खळबळ उडाली आहे.

बिंदास काव्याचे युट्यूब, इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. तिच्या व्हिडीओला लाखापेक्षा अधिक व्हुज असतात. ९ सप्टेंबर रोजी दुपारी बिंदास काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती अद्याप परतलेली नाही. आईवडिलांनी तिचा शोध घेतला. मित्र-कुटुंबीयांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. अखेर बिंदास काव्याच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

बिंदास काव्या कमी वयात युट्यूबवर चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. बिंदास काव्याने रागाच्या भरात घर सोडल्याचे बोलले जात आहे. सध्या औरंगाबाद पोलिसांकडून बिंदास काव्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत काव्या बेपत्ता झाल्याची माहिती दिली. या सोबतच तिच्या पालकांनी घरी परत येण्यासाठी साद घातली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles