Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.
योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
हेही वाचा :
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद