नांदेड : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील जिल्हा समूह संघटक आणि तालुका समूह संघटक यांनी नुकताच देशातील सर्वात मोठी आणि क्रांतिकारी लढाऊ कामगार – कर्मचारी संघटना सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) मध्ये प्रवेश केला असून त्यांचे सीटू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने स्वागत करून अभिनंदन करण्यात आले आणि पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका समूह संघटक आणि गटप्रवर्तक (सुपरवायझर) उपस्थित होत्या. नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दि.११ जानेवारी रोजी त्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सीटूच्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार आणि जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले आणि नूतन साथींना “हम आपके साथ हैं – लढेंगे और जितेंगे! अशी साद देत त्यांचा आत्मविश्वास वाढविला.राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा समूह संघटक तथा फेडरेशनचे राज्य कोषाध्यक्ष सिद्धार्थ थोरात यांनी सीटू पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
