पुणे: जगातील आघाडीचे मायक्रो-ब्लॉगिंग अॅप असेलेले ट्विटर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्याकडे आले आहे. मस्क यांनी पदभार स्वीकारताच सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आज(दि.28) रोजी ट्विटर अधिग्रहणच्या अंतिम मुदतीपूर्वीच त्याचे नवीन मालक बनले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल आणि मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) नेड सेगल यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एलॉन मस्क यांनी ट्वीटरवर ताबा घेताच पहिल्यांदा ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांना ट्विटरच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आल्याचेही वृत्त आहे. ट्विटरच्या कायदेशीर टीमच्या प्रमुख विजया गड्डे यांनाही बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
एलोन मस्क बनले ट्विटर चे नवे मालक !
---Advertisement---
- Advertisement -