Monday, March 31, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले वाचा !

Kunal Kamra Controversy : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना फुटीवर आधारित या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नाव न घेता टीका करण्यात आली होती. आता या वादावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी हे गाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून नियोजित बदनामी असल्याचा आरोप केला आहे.

---Advertisement---

कामराने सुपारी घेऊन बदनामी केली – शिंदे यांचा आरोप | Kunal Kamra

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे गंभीर आरोप करत म्हटले की, “ही तर कुणाची तरी सुपारी घेऊन केलेली बदनामी आहे. ते पुढे म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांपासून आमच्यावर अनेक आरोप झाले, पण आम्ही कधीही आरोपाला आरोपाने उत्तर दिले नाही. आम्ही आमच्या कामातून उत्तर दिले आणि लोकांनी आम्हाला भरभरून समर्थन दिले.” (हेही वाचा – कुणाल कामराच्या प्रकरणावर ध्रुव राठीने दिली प्रतिक्रिया, पैसेही पाठवले)

“हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, अश्लीलतेचं प्रदर्शन”

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आमचा विश्वास आहे, असे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, “विडंबन आम्ही समजू शकतो, पण हे जे काही सादर केले गेले, ते विडंबन नसून अश्लीलतेचं प्रदर्शन आहे.” त्यांच्या मते, कामराने केवळ आपल्यावरच नाही, तर सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही वारंवार टीका केली आहे, जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीबाहेरची आहे. (हेही वाचा – खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; भत्त्यासह पेन्शनही वाढली)

---Advertisement---

हॉटेल तोडफोड प्रकरणावरही प्रतिक्रिया

काही शिवसेना कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या विरोधात हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “मी हॉटेल तोडफोडीस समर्थन देत नाही, पण ती कार्यकर्त्यांची भावना होती.” तसेच, अशा गोष्टींना खूप महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)

कामराच्या गाण्यामुळे राजकीय वातावरण तापले

कुणाल कामराच्या या गाण्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू असून, काहींनी हे गाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी याला शिवसेनेच्या नेतृत्त्वावर केलेला नियोजित हल्ला म्हटले आहे. आता या वादावर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (हेही वाचा – धक्कादायक : दौंडमध्ये कचराकुंडीत प्लास्टिकच्या डब्यात आढळले मृत अर्भके)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles