Thursday, February 13, 2025

संपाचे दुष्परिणाम, नागपूर मेडिकल मध्ये 24 तासात 11 मृत्यू ?

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.नागपूरच्या (Nagpur) मेडीकल या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत ११ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काल सकाळी ८ पासून ते आज सकाळी ८ पर्यंत ११ जणांचा मृत्यु झाला आहे.

तर संपाच्या पहिल्या दोन दिवसांत २५ रुग्णांचा मृत्यू झालाय. नागपूर मेडीकलमध्ये रोज सरासरी ८ ते १० रुग्णांचा मृत्यु होतात. मात्र, संपाच्या काळात या मृत्युच्या प्रमाणात थोडी वाढ झाली. ही बाब नागपूर मेडीकल शासकीय रुग्णालयाचे (Hospital) अधिष्ठाता डॉ. राज गजभीये यांनी मान्य केली आहे. पण हे रुग्ण उपचाराअभावी दगावले नाहीत तर ते गंभीर होते असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नागपूर मेडीलमधील ९०० नर्सेस संपावर गेले आहे. त्यामुळे खाजगी महाविद्यालयातील नर्सिंगचे विद्यार्थी आणि MBBS च्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेत लावण्यात आलं आहे असंही डॉ. गजभीये यांनी सांगितलं आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles