मावळ : आधार शैक्षणिक संस्थेच्या वतीने सांगिसे येथील उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याची मदत, करिअर मार्गदर्शन व गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे हे होते. तर संस्थापक किशोर थोरात विद्याताई काशिद, सुरज फलके, केतकी काशीद यांची प्रमुख उपस्थित होती.
विशेष लेख: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
सांगिसे या दुर्गम व डोंगरी भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लाभावा या उद्देशाने आधार संस्थेच्या वतीने ‘नवी पहाट’ या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेश गावडे व सुगंधा गावडे यांच्या वतीने गरजू परिवारास शिलाई मशीन व पाल्यास शालेय साहित्याची मदत करण्यात आली. तसेच या शैक्षणिक वर्षातील विशेष प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थी व कठीण परिस्थितीत मुलींचे शिक्षण करणा-या पालकांचा आदर्श पालक म्हणून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. तसेच शाळेस 10 खुर्च्यांची मदतही संस्थेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी गुणवंत विद्यार्थी वैष्णवी गुलाब जाधव, प्रतिकुल व कठीण परिस्थिती मुलीचे शिक्षण करणाऱ्या रेखा राजू सुतार यांचा आदर्श पालक म्हणून तर जिल्हास्तरीय विज्ञान समस्या परिहार स्पर्धा 2022 मध्ये विशेष प्राविण्य सिदधी बबन गायकवाड, जान्हवी किशोर थोरात, जान्हवी रमेश ढवळे, वैष्णवी रोहिदास पिंगळे यांचा गौरव करण्यात आला.
घाटघर शाळेला पर्यावरण संवर्धन असोसिएशन च्या वतीने सौर वीज युनिट व लॅपटॉप संच
यावेळी अध्यक्षीय भाषणात अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुणवत्ता असून त्यांनी चिकाटीने अभ्यास करून व परिश्रम घेवून भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती सुनिता वंजारी यांनी केले तर आभार अंबादास गर्जे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर अरनाळे, अनिल शिंदे, दशरथ ढोरे, अमोल आल्हाट यांनी परिश्रम घेतले.
– क्रांतिकुमार कडुलकर
JNU मध्ये पुन्हा राडा, abvp च्या गुंडांकडून विद्यार्थ्यास मारहाण
जुन्नर तालुका शिक्षक समितीचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न