Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

हल्लेखोरांवर योग्य कारवाई करा : आप

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : आम आदमी पक्षाचे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यावर दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी खुनी हल्ला झाला, त्याच्या विरोधात आज निषेध आंदोलन जुनी सांगवी संविधान चौकात करण्यात आले.

लोकशाही विरोधी शक्ती दिल्ली मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या घरावर हल्ला आणि तोडफोड करत आहेत. त्याच प्रकारे पिंपरी चिंचवड मध्ये पण समाजात चांगलं काम करून जनते मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या आप च्या पदाधिकारी व्यक्तीवर असे जीवघेणे हल्ले होत आहेत, असे आपचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले.

JNU मध्ये पुन्हा राडा, abvp च्या गुंडांकडून विद्यार्थ्यास मारहाण

शांताराम बोऱ्हाडे म्हणाले की, “अशा प्रवृत्तीना ठेचण गरजेचं आहे, पोलिसाचा वचक कमी होत असल्याने शहरात अशी गुन्हेगारी वाढत आहे. राजकीय लोक शहरात सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेची सुरक्षेची हमी मिळणं अवघड आहे. शहरात आशा घटनेमुळे शहराला प्रतिमा खराब होत आहे.”

डॉक्टर विग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष डॉ. अमर डोगरे म्हणाले की, “तुम्ही खुनी हल्ले करून माणस मारू शकता, विचार मारणं कठीण आहे. शहरातील राजकीय लोकांना एकंच सांगणं आहे, विचाराची लढाई विचारांनी लढा, विचाराची लढाई विचाराने तुम्ही लढू शकतं नसल्याने असे खुनी हल्ले करत आहात. आशा प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.”

विशेष लेख : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले

या आंदोलनात चेतन बेंद्रे, सरफराज मुल्ला, नाथ शिरसाठ,  कांबळे ताई, तेजस्विनी नसरूला, आम आदमी रिक्षा संघटना सदस्य स्वप्निल जेवळे, इम्रान खान, आशुतोष शेळके, चंद्रमनी जावळे, ब्रम्हांडर सतीश यादव, विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, समीर शब्बीर अरावडे, सचिन भोंडे, हनुमंत झाडे, राघवेंद्र राव, ब्राह्मनंद जाधव, अजय सिंग, प्रविण शिंदे, एकनाथ पाठक आदीसह पुणे, पिंपरी चिंचवड समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील होते.  

– क्रांतिकुमार कडुलकर


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles