Wednesday, February 12, 2025

E-Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी..

E-Ration Card (वर्षा चव्हाण) – शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही.कारण, आता रेशनकार्ड छपाई बंद करण्यात आली आहे.
याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकणार आहात. तसंच, तुमच्याकडे असलेले रेशन कार्डही वॅलिड राहणार आहे. (E-Ration Card)

# रेशन कार्डची छपाई का बंद करण्यात आली?

रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई-पॉजद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो. आधी या वितरित केलेल्या मालाची रेशनकार्डवर त्याची नोंद घेतली जात होती. आता *ई पॉज* आल्याने आपल्याला ऑनलाईन नोंदणी ठेवता येते. त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई बंद केली. ई शिधापत्रिका वॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल. तसंच, सरकारी योजनांचा लाभही यातून घेऊ शकतो.

# ई रेशन कार्डचं वर्गीकरण कसं होणार?

उत्पन्न गटानुसार रेशनकार्डचे वर्गीकरण केलेले होते
▪️दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना – पिवळे रेशनकार्ड
▪️सामान्य अंत्योदय लाभार्थ्यांना – केसरी रेशनकार्ड
▪️आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांना – पांढरे रेशन कार्ड
परंतु, या रेशनकार्डांची छपाईच आता बंद होणार असल्याने ई- रेशन कार्डमध्ये याचं वर्गीकरण कसं होणार?
ई – रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे.

E-Ration Card

दरम्यान, तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई- शिधापत्रिकाच मिळणार आहे. तसंच, ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे, त्यांना जर दुय्यम ई – रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठीही अर्ज करता येणार आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ

‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या

मोठी बातमी : आगीच्या अफवेमुळे प्रवाशांच्या धावत्या रेल्वेमधून उड्या, समोरच्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

Related Articles

- Advertisement -

Latest Articles