Wednesday, April 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

DYFI : माजलगाव येथे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती व सरकारी शाळेचे खाजगीकरणाच्या निर्णयाची होळी

निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार – मोहन जाधव

---Advertisement---

बीड : महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेंबर 2023 रोजी सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने नोकरी करु पाहणाऱ्या युवकांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरणामुळे नोकऱ्यामधील सामाजिक सुरक्षा, आरक्षण, वेतन, भविष्य निर्वाह निधी याबाबी संपुष्टात येतील सुरक्षित कायमस्वरुपी रोजगार संपेल. सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या हक्काच्या सरकारी नोकरीस मुकावे लागेल. तसेच महाराष्ट्रातील 62 हजार शासकीय शाळा, दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली कंत्राटदाराच्या घशात घालून, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय 18 सप्टेंबर रोजी सरकारने घेतला आहे. हा निर्णय सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. यामुळे या दोन्ही जीआर ची होळी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ( DYFI ) या युवक संघटनेच्या वतीने माजलगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये करण्यात आली. Recruitment of employees on contract basis and decision of privatization of government schools

---Advertisement---

हे दोन्ही निर्णय सरकारने वापस न घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कॉम्रेड मोहन जाधव यांनी संघटनेच्या वतीने दिला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, उपाध्यक्ष ॲड. सय्यद याकूब, तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण, तालुका सचिव सुहास झोडगे, शहर अध्यक्ष सय्यद फारुख, माकप तालुका सचिव कॉ. बाबा सर, एसएफआयचे लहू खारगे, बालाजी कुंडकर, विजय राठोड, रुपेश चव्हाण, बाबा, सय्यद रफीक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहुल टाकणखार, दत्ता कांबळे, बाळासाहेब सोनसळे, एकनाथ सक्राते, प्रहार शिक्षक संघटनेचे लक्ष्मण सरवदे, अमोल राऊत मुप्टा शिक्षक संघटना आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला. आबा राठोड, समीर शेख, ढगे भाऊ, शेषेराव आबुज, रामचंद्र चिंचाने, दिनकर जोगडे, संदीपान पाडमुख, दत्ता पवार आदी युवक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles