Wednesday, March 12, 2025

संतापजनक : मद्यधुंद तरुणाचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल

Pune BMW Car : आंतरराष्ट्रीय महिला दिनी संपूर्ण जगभरात स्त्री-सन्मानाचा जागर होत असतानाच, पुणे शहरात एका श्रीमंत घराण्यातील तरुणाच्या मस्तवालपणाचा संतापजनक प्रकार घडला आहे. शहरातील शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद तरुणाने सार्वजनिक ठिकाणी निर्लज्जपणे लघुशंका करीत महिलांसमोर अश्लील वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे प्रकरण? (Pune BMW Car)

एका बीएमडब्ल्यू (BMW) कारमधून दोन मद्यधुंद तरुण प्रवास करत होते. यातील एका तरुणाने शास्त्रीनगर चौकात अचानक गाडी थांबवली. पूर्णतः मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या तरुणाने निर्लज्जपणे आपल्या पँटची झिप उघडून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केली. विशेष म्हणजे, या वेळी चौकात काही महिला उपस्थित होत्या, त्यामुळे हा प्रकार अधिकच संतापजनक ठरला.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या तरुणाला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या तरुणाने कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता लोकांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे, तर त्याचा सोबतीही या कृत्याला पाठिंबा देत मद्यधुंद अवस्थेत त्याच्यासोबत हसत-खिदळत होता.

या प्रकाराचा संपूर्ण व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये हा तरुण निर्लज्जपणे लघुशंका करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर, त्याने आणि त्याच्या मित्राने रस्त्यावर उपस्थित लोकांकडे दुर्लक्ष करून आणि अश्लील हावभाव करत गाडी पुन्हा सुरू केली व वेगाने वाघोलीच्या दिशेने निघून गेले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

ही घटना समोर आल्यानंतर, महिलांच्या सुरक्षिततेबाबत नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सन्मानाची संकल्पना ढासळली आहे. मद्यधुंद तरुणांचा हा बेजबाबदार आणि असभ्य प्रकार पाहता, पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

हे ही वाचा :

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खूलासा

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles