आंबेगाव : कोविड काळात शासनाचे विविध विभागातील कर्मचारी जे काम करत आहेत ते अभिनंदनीय असे आहे. या अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व जनतेची .
बांधिलकी म्हणून नुकतेच आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कापडी मास्क वितरित करण्यात आले.
रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या सहकार्याने व कांताताई नाईक यांच्या पुढाकाराने, व आदिम संस्था, आणि किसान सभा यांनी या उपक्रमाचे स्थानिक संयोजन केले होते.
घोडेगाव येथील पोलीस स्टेशन येथील पोलीस बांधव, वीज विभागातील कर्मचारी, कृषी विभागातील कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर व प्राथमिक आरोग्य केंद्र अडविरे येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हे कापडी मास्क वितरित करण्यात आले.
याचे स्थानिक संयोजन डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी, अशोक जोशी, अनिल गाडेकर व समीर गारे यांनी केले होते.