Sunday, April 6, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

Police Bharti : सध्या राज्यात पोलिस मोठी पोलिस भरती होत आहे. राज्यभरात तब्बल १७ हजार ४७१ पदांसाठी मेगा होत असून पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया नुकतीच सुरू झाली. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी सतत पाऊस होत आहे. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Police Bharti)

---Advertisement---

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मैदानी चाचण्यांच्या ठिकाणांची परिस्थिती खराब झाली आहे. पावसामुळे मैदानावर चिखल आणि पाणी साचल्याने उमेदवारांना धावण्यास आणि इतर शारीरिक चाचण्या पार पाडण्यास अडचण निर्माण झाली आहे. या सोबतच इतर भागातील तरुण तरुणी यांच्या मैदानी चाचणीसाठी सदर ठिकाणी आल्यावर त्यांची निवाऱ्याची व आहाराची गैरसोय होत आहे. या पार्श्वभुमीवर पोलिस भरतीची मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. (Police Bharti)

या सर्व पार्श्वभुमीवर पाऊस सुरू असणाऱ्या जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गृहमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या ठिकाणी पाऊस आहे. त्या ठिकाणची पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठी पुढच्या तारखा देण्यात येतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

---Advertisement---

Police Bharti बाबत काय म्हणाले फडणवीस ?

राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसामुळे मैदानात पाणी साचल्याने उमेदवारांना अडचणी येत आहेत. या परिस्थितीत, ज्या ठिकाणी पाऊस आहे, त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुढील तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. तसेच, ज्या ठिकाणी पाऊस नाही, तिथे भरती प्रक्रिया सुरू राहील.

फडणवीस यांनी उमेदवारांच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव व्यक्त केली आणि प्रत्येक उमेदवाराला संधी मिळायला हवी, असे म्हटले. पावसामुळे व्यत्यय निर्माण झाल्याने काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर, फडणवीस यांनी पुढच्या तारखा जाहीर करण्याचे आश्वासन दिले आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबतही सूचना दिल्या.

google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

---Advertisement---

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles