---Advertisement---
प्रतिनिधी : केंद्र कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला प्रतिसाद देत बांधकाम कामगार संघटना व जनवादी महिला संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली.
लॉकडाऊनचे नियम पाळत शारिरीक अंतर राखून हे आंदोलन करण्यात आले. बांधकाम कामगारांना १० हजार रुपये मदत करा, गरीब व गरजू लोकांना किमान ६ महिने प्रति व्यक्ती १० किलो धान्य मोफत द्या, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा, वीज बिल माफ करा, आदी मागण्या करण्यात आल्या.
---Advertisement---
यावेळी सोमनाथ बोडरे, महादेव सुतार, शशिकला बुधावले आदीसह नागरिक उपस्थित होते.