पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : तळवडे रूपीनगर येथील राजपूत समाज बांधवाच्या मातोश्री गारमेंट या कपड्याच्या दुकानावर शनिवार दिनांक ०८ जुलै २०२३ ला रात्री १०:०० वाजता सहा गुंडांनी हातात धारदार कोयत्याने दुकान मालक व दुकानात काम करणाऱ्या कामगारावर वार करून दुकानाची तोडफोड करत दरोडा टाकला व काही कपडे घेवून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुकानाचे मालक राजेंद्र सिंह राठौड व त्याचा पुतण्या भरतसिंह राठौड यांना किरकोळ जखमा देखील झाल्या सुदैवाने भरतसिंह यानी त्याचा हाथ मध्ये टाकल्याने राजेंद्र सिंह यांच्या डोक्यात होणारा कोयत्याचा वार हुकला व तो वार भरतसिंहच्या हातावर होवून हाथ रक्तबंबाळ झाले. दरोडेखोर दुकानातून जात असताना त्यांच्या हातातील धारदार कोयते नाचवत बाजूला असलेल्या गल्लीतून आरडाओरडा करत रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहनांचे काच फोडत त्या भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोयता गॅंगच्या दरोडेखोराकडून करण्यात आला.
जखमींना रुग्णालयात नेवून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.पिंपरी चिंचवड शहरातील रूपीनगर हा भाग खुप गर्दीचा आहे,तसेच येथे अनेक मोठ्या शाळा आहेत. या भागातील टवाळखोर मुलं नेहमी झुंडीने शाळेच्या बाहेरील आवारात तसेच काही शाळांमध्ये तेथे शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात तसेच वाहन परवाना नसतांना मुख्य रस्त्यावर गर्दिच्या ठिकाणी वेगाने गाड्या तसेच रिक्षा चालवतात त्यामुळे आतापर्यंत खुप अपघात झाले आहेत. मागील दहा दिवसात याभागात तीन गुन्हे घडले आहे त्यामध्ये एक हाफ मर्डर, एक मर्डर व एक लहान अल्पवयीन मुलीला पळवून नेलेले आहे. या भागात पोलीस प्रशासनाचा म्हणावा तसा दबदबा नसल्याने तसेच येथील पोलीस चौकी मध्ये कमी मनुष्यबळ असल्याने येथील गुन्हेगारी वाढली आहे.येथे मनुष्यबळ व अधिकारी यांची अधिकची नेमणूक व्हावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड पुणे या संस्थेच्या वतीने त्यांचे सभासद असलेल्या राजेंद्र सिंह राठौड यांच्या मातोश्री गारमेंट या कपड्याच्या दुकानात टाकलेल्या सशस्त्र दरोड्यातील कोयता गॅंगच्या आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे व परत अशा घटना या परिसरात तसेच पिंपरी चिंचवड शहरात घडू नये यासाठी कठोर पाऊले उचलावीत या प्रकारचे निवेदन अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांना देण्यात आले. परदेशी यांनी यावेळी सांगितले की पाच दरोडेखोर आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत व जो मुख्य आरोपी आहे त्याला ही लवकरच जेरबंद करून अटक करून त्यांच्यावर कडक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी संघटनेला देवून चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर काटकर यांच्या नेतृत्वाखाली अटक केलेल्या सराईत आरोपींची घटना घडलेल्या परिसरात धिंड काढण्यात आली.
निवेदन देतांना संघटनेचे भरतसिंह पाटील,राजेंद्रसिंह राठौड, माजी नगरसेवक धनंजय भालेकर, सुखदेव नरळे, अनिल परिहार, गणेशसिंह राजपूत, रूपेश राजपूत, सुनिल पाटील, रविंद्र कच्छवे, सागरसिंह बघेल, जितेंद्र पाटील, विनोद जाधव, प्रविण राजपूत, ललीत पवार, सुरेश सुर्यवंशी यांच्या सह इतर समाज बांधव उपस्थित होते. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बैस यांनी दिली आहे.
हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार
कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद
रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

