Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Delhi Fire : दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

Delhi Fire : दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री आग लागली. या अपघातात 7 मुलांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाला रात्री 11.32 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. पोलीस आणि अग्निशमन विभागाने 12 मुलांची सुटका केली असून त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील ५ मुलांना ईस्ट दिल्ली ॲडव्हान्स्ड केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, विवेक विहारमधील ब्लॉक बी जवळील बाल संगोपन केंद्रातून आग लागल्याची माहिती मिळताच एकूण नऊ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. मात्र, दिल्ली बेबी केअर सेंटरमधील दुर्घटनेत 7 मुलांचा मृत्यू झाला.

गेल्या 24 तासांत गुजरात ते दिल्लीपर्यंत तीन मोठ्या आगीच्या घटनांमध्ये 19 मुलांसह 38 जणांचा मृत्यू झाला. राजकोट आगीत 12 मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला. तर कृष्णा नगरमधील एका घराला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर सेंटरच्या आगीत सात निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे.

---Advertisement---

दरम्यान, दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरच्या दुर्घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, मुलांच्या रुग्णालयातील आगीची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला जात असून या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

Delhi Fire

दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, या दुःखाच्या प्रसंगी सहानुभूतीचे सर्व शब्द अपुरे आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

---Advertisement---

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles