सुरगाणा / दौलत चौधरी : अतिदुर्गम पिंपळसोंड उंबरपाडा गावातील आरोग्य विषयी समस्यांची कैफियत ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिल्ली दरबारी मांडली.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना सारख्या काळात लाॅकडाऊन मुळे गुजरात राज्याच्या सिमा बंद करण्यात आल्या होत्या. पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी गुजरात राज्यातून जावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांना उपचारासाठी जाता येते नव्हते.
या प्रवेश बंदीमुळे आरोग्य समस्या उद्भवतात याकरिता पिंपळसोंड येथील ग्रामस्थांनी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरु करण्यात यावे. अशा आशयाचे ग्रामस्थांचे निवेदन दिंडोरी लोकसभेच्या खासदार तथा केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्या कडे जलपरिषदेचे सदस्य तथा आदिवासी बचाव अभियानचे सामाजिक कार्यकर्ते रतन चौधरी यांनी दिले आहे.
अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड,उंबरपाडा गावातील आरोग्य कोरोना सारख्या काळात लाॅकडाऊन मुळे गुजरात राज्याच्या सिमा बंद करण्यात आल्या होत्या. सदर भाग गुजरातच्या सिमावर्ती लगतचा असल्याने रुग्णालयात गुजरात राज्यात जावे लागते. मात्र कोरोना काळात पहिल्या व दुस-या लाटे प्रसंगी सिमा लाॅक केल्या होत्या. त्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. याकरीता पिंपळसोंड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या अतिदुर्गम खुंटविहीर, मालगोंदे, चिंचमाळ, बर्डा, गाळबारी, झारणीपाडा, गोणदगड, उदालदरी आदी वाडा, वस्तीवरील सात हजार पेक्षा जास्त नागरिकांना उपचारासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ होऊ शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर माजी सैनिक शिवराम चौधरी, तुळशीराम खोटरे, मणिराम चौधरी, लता देशमुख, रंगुभाय चौधरी, मोतीराम चौधरी, गोविंद देशमुख, रतन खोटरे, रतन बागुल आदींच्या सह्या आहेत.