Tuesday, January 21, 2025

‘पाच ट्रिलियनच्या नादात सगळं विकलं’, ‘मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवा’ पहा नक्की काय आहे प्रकरण

‘पाच ट्रिलियनच्या नादात सगळं विकलं’, ‘मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवा’ #Resign PRimeMinister ट्रेण्डमध्ये #Resign PRimeMinister या हॅशटॅगमधील प्राइम शब्दातील पी आणि आर ही अक्षर मुद्दाम कॅपीटलमध्ये वापरुन मोदी केवळ जाहिरातबाजी करणारे पंतप्रधान असल्याचा टोला देखील लगावलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल नेटवर्किंगवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या समर्थकांनी ट्विटरवर #Resign_PRimeMinister हा हॅशटॅग वापरुन आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. एकीकडे देशामधील पेट्रोल, खाद्यतेल, भाज्यांचे दर वाढलेले असतानाच दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था, नोकऱ्यांची संधी, रोजगार आणि जीडीमध्ये घट होतानाचे चित्र दिसत असल्याची टीका केली जात आहे.

मंगळवार सायंकाळपासून सोशल नेटवर्किंगवर सुरु झालेल्या #Resign_PRimeMinister या ट्रेण्डमध्ये हजारो लोकांना ट्विट केलं असून सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. पाच ट्रिलीयन इकनॉमीच्या नावाखाली सरकारने सारं काही विकून टाकलं आहे, मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवण्याची गरज आहे. मोदी हे केवळ जाहिराती करतात , जनता त्रस्त … भाजपा मस्त .. , ब्लू टीकसाठी लढतात लसींसाठी नाही या आणि अशा अनेक पद्धतीच्या टीका सोशल नेटवर्किंगवरुन करण्यात आल्या आहेत. अगदी महाराष्ट्र काँग्रेसपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवरुन हा हॅशटॅग वापरुन ट्विट्स केले आहेत. ठराविक उद्योजकांना संधी दिली जाते अशी टीका मुंबई विमानतळासंदर्भात मंगळवारी झालेल्या करारासंदर्भात बोलताना अनेकांनी केलीय . तसेच पंतप्रधान केवळ जाहिरातबाजी करतात असाही आक्षेप अनेकांनी घेतलाय.

पाहुयात असेच काही व्हायरल ट्विट्स

Related Articles

- Advertisement -

Latest Articles