जुन्नर / महेश घोलप : डिसेंट फाउंडेशन व ग्रामपंचायत वैष्णवधाम ( बुचकेवाडी ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुमेह व स्त्रीरोग जनजागृती मिळाव्यात उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या जेष्ठ सदस्या आशाताई बुचके उपस्थित होत्या. वैष्णवधाम बुचकेवाडी ता. जुन्नर येथे शंभर रुग्णांची रक्त, रक्तदाब, मधुमेह व शारीरिक तपासण्या मोफत करण्यात आल्या.
यावेळी प्रसिद्ध मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ.सी. जी. कुलकर्णी व स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रीती कोकाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, प्रकल्प समन्वयक फकीर आतार, प्राथमिक आरोग्य केंद्र वैष्णवधाम च्या डॉ. कवठेकर मॅडम, हिंदू लॅबचे संचालक मंगेश साळवे, सरपंच सुदाम ढेरे, उपसरपंच सुरेश गायकवाड, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दगडू पवार, सत्यवान खंडागळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, 13 जून 2022 शेवटची तारीख
..अन्यथा हिरड्याच्या प्रश्नांवर 30 मे पासून बेमुदत आंदोलन, घोडेगाव प्रकल्प कार्यालयात बैठक
कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 3 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड