Thursday, February 13, 2025

दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड नाशिक विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी कॉम्रेड राजू देसले यांची निवड

नाशिक : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड केंद्रीय कामगार मंत्रालय दिल्ली च्या नाशिक विभाग 11 जिल्हा उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा चा समावेश असलेल्या सल्लागार समिती सदस्य पदी आयटक राज्य सचिव महाराष्ट्र, आशा, गटप्रवर्तक, मनरेगा कंत्राटी कर्मचारी, घरकामगार मोलकरीण, बांधकाम कामगार, इपीएस 95 पेन्शनर्स , आदी असंघटित कामगार कर्मचारी साठी कार्यरत असलेले कॉम्रेड प्रकाश (राजू देसले) नाशिक यांची 2 वर्ष साठी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या वतीने कामगार साठी प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येतात. कामगार नेतृत्व, कार्यकुशलता, आर्थिक नियोजन, बचतीचे महत्त्व, वेसनमुक्ती, शासकिय विविध योजना माहिती, कामगार कायदे, मानसिक ताण तणाव प्रश्नी कार्यक्रम विषयावर 2 दिवसीय, 4 दिवसीय शिबीर आयोजित करण्यात येतात. सल्लागार समिती नियुक्ती चे पत्र विभागीय डायरेक्टरमा. सारिका डोईफोडे केंद्रिय कामगार शिक्षण मंडळ नाशिक विभाग यांच्या सहीने दिले आहे. या निवडीबद्दल आयटक राज्य सचिव कॉम्रेड श्याम काळे, राज्य उपाध्यक्ष व्ही डी धनवटे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles