डहाणू (पालघर) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी आमदार निधीतून रुग्णवाहिका खरेदी केली. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा डहाणू उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार निकोले यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कॉ. चंद्रकांत गोरखाना, डॉ. आदित्य अहिरे, डॉ. चव्हाण, रईस मिर्झा, यशवंत कडू,जाधव, रोटरी क्लब ऑफ डहाणू चे अध्यक्ष यशवंत कोळपे, सेक्रेटरी संजय कर्नावट, विजय पारेख व अन्य उपस्थित होते.