Sunday, March 16, 2025

‘या’ देशात चक्रीवादळाचा कहर; 40 हजार घरांत वीज पुरवठा खंडित, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

न्युझीलंड येथील बेटावर उष्णकटिबंधीय वादळाचा तडाखा बसल्यानंतर न्यूझीलंड सरकारनं आज (मंगळवार) राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. न्यूझीलंडच्या इतिहासात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होण्याची ही तिसरी वेळ आहे.
2019 मध्ये क्राइस्टचर्च दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि 2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

40 हजारांहून अधिक घरांत वीज खंडित

‘गॅब्रिएल’ चक्रीवादळामुळं न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झालंय. तसंच समुद्राच्या लाटाही उसळत आहेत. न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं 40,000 हून अधिक घरांची वीज गेलीये आणि शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं हजारो घरांत वीज नसल्यामुळं आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री किरन मॅकअनल्टी (Kieran McAnulty) यांनी या घोषणेवर स्वाक्षरी केली. मॅकअनल्टी म्हणाले, ही एक अभूतपूर्व हवामान घटना आहे. ज्याचा उत्तर बेटावर मोठा परिणाम होत आहे. पुराचं पाणी आणि भूस्खलनामुळं देशभरातील अनेक गावांचं मोठं नुकसान झालं आहे, असं त्यांनी सांगितलं.

सोर्स ANI

Related Articles

- Advertisement -

Latest Articles