तमिळनाडू : फेंगल चक्रीवादळ शनिवारच्या संध्याकाळी तमिळनाडू-पुदुचेर्री किनाऱ्यावर धडकले. रेल्वे,विमान आणि सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली. पुद्दुचेरी मध्ये मुसळधार पाऊस पडून जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. (Cyclone)
प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सैन्याच्याचेन्नई गॅरिसन बटालियन शनिवारी रात्री सुमारे 1 वाजता पुडुचेरी मध्ये पूरग्रस्त भागांमध्ये बचाव कार्य सुरू केले. बोलावली. पुडुचेरीच्या कृष्णानगर क्षेत्रात सुमारे 500 घरांमध्ये अडकलेले नागरिकांना वाचवण्यासाठी जवानांनी ऑपरेशन सुरू केले, जिथे काही भागांमध्ये पाणी पातळी सुमारे 5 फूटपर्यंत पोहोचली होती.
चेनईमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, ताशी 90 किमी वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस सर्वत्र पडत होता.या वादळामुळे श्रीलंकेत किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. (Cyclone)
फेंगल चक्रीवादळाने तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात मोठे नुकसान केले. सुमारे सहा तास चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने प्रशासन हैराण झाले. भारतीय हवामान विभागानं तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी केला होता. रविवारी सायंकाळी वादळाचा आणि पावसाचा प्रकोप कमी झाला.


हे ही वाचा :
ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले
PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C
PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर
PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन