मुंबई : इंडियन ऑइलने सोमवारी रशियाशी 3 दशलक्ष बॅरल तेलाचा करार केला, जो मे मध्ये पुरवठा केला जाईल. फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतरचा हा पहिला करार आहे. हा करार अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा अमेरिकेने रशियन तेल आयातीवर बंदी घातली आहे आणि युरोपियन देश देखील तसे करण्याचा विचार करत आहेत.
जागतिक बाजारपेठेतून भारत सरकार 80 टक्के कच्चे तेल खरेदी करतो. त्यातील 3 टक्के तेल रशियाकडून खरेदी केले जाते. युक्रेन युद्धामुळे रशियन तेल विक्रीवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. त्याचवेळी रशियाने सवलतीच्या दरात भारताला क्रूड पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आप चे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शहीद भगतसिंगांच्या गावात शपथविधी
भारत रशियाची सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो. भौगोलिक परिस्थिती, वाहतूक खर्च याचा विचार करता रशियाकडून तेल टँकरशिपची वाहतूक भारताला खर्चिक पडते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताला भेट दिली. त्यावेळी रोझनेफ्ट आणि इंडिया ऑइल कॉर्पोरेशनने 2022 च्या अखेरीस नोव्होरोसियस्क बंदरातून भारताला 20 दशलक्ष टन तेल पुरवठा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
भारत हा अमेरिका आणि रशियासारख्या देशांकडून तेल खरेदीत वाढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. बॅरल कच्च्या तेलाचे शुद्धीकरण केल्यानंतर सुमारे 74 लिटर पेट्रोल, 36 लिटर डिझेल, 20 लिटर जेट इंधन, 6 लिटर प्रोपेन आणि सुमारे 34 लिटर ब्युटेन, एस्फॉल्ट, सल्फर इत्यादी मिळते.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार; डोंगरी भागात शिक्षकांची नियुक्ती करणार
रशिया जगातील तिसरा तेल उत्पादक देश आहे. तेलाच्या किमती करून रशिया अमेरिकेच्या निर्बंधावर मात करण्याची शक्यता आहे. तेलाच्या किमती रशियन डावपेचामुळे घसरल्यास अमेरिकन, सौदी तसेच ओपेक गटातील देशांच्या ऑइल कंपन्यांना नुकसान सहन करावे लागते, रशिया ओपेकचा सदस्य नाही.
भारताचे प्रचंड परकीय चलन रशिया बरोबरच्या नव्या तेल करारामुळे वाचेल. युक्रेन रशिया संघर्षात तेलाच्या किमती वाढून अमेरिकन, ओपेक तेल कंपन्यांचा आता फायदा होणार नाही, संभाव्य इंधनवाढ होणार नाही, असा अंदाज आहे.
आमदारांच्या निधीत घसघशीत वाढ, पीए आणि ड्रायव्हरच्या पगारात सुध्दा वाढ