घोडेगाव : असंविधानिक पद्धतीने आंदोलन करून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बिरसा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षांसह ११ जणांविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद स्वप्निल मारुती वाघमारे (वय २४ वर्षे, रा तानाजी पार्क दत्तकृपा निवास चिंचवड पुणे) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास घोडेगाव गावचे हद्दीत ओम साई मंगल कार्यालय जुन्नरफाटा ता.आंबेगाव जि पुणे येथे जनजाती सुरक्षा मंच या संघटनेचा आदिवासी समाजातून धर्मांतर केलेल्या लोकांना आदिवासी समाजाचा लाभ मिळू नये याबाबत जनजागृती कार्यक्रम चालू होता.
आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप देण्याची मागणी, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये
त्यावेळी राहुल विठ्ठल कवठे (रा. जांभुळशी ता. जुन्नर जि पुणे) शुभम चंद्रकांत उंडे (रा. राळेगण ता. जुन्नर जि पुणे) संजय भाऊ भांगे (रा. तांबे ता. जुन्नर जि पुणे) तुषार यमना वालकोळी (रा.तांबे ता. जुन्नर जि पुणे) मारुती कांताराम चिमटे (रा. कुसवली ता.मावळ जि पुणे) बिरसा बिग्रेड कार्यकर्ते व आदिवासी विचारमंच कार्यकर्ते यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवुन कार्यक्रम चालू असताना आतमध्ये अनाधिकाराने प्रवेश करुन “आदिवासी हिंदु नाहीत” अश्या जोरजोरात घोषणा देऊन गोंधळ घातला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना शांत बसा असे म्हणत असताना त्यांनी आम्ही तुमचा कार्यक्रम येथे होऊ देणार नाही असे म्हणून दमदाटी केली.
तसेच सायंकाळी ४ वाजताचे सुमारास फिर्यादी घोडेगाव गावातील डॉ. पोतनिस यांचे दवाखान्यासमोर लावलेली मोटारसायकल दुरुस्तीकरिता पंचायत समिती घोडेगाव चे समोर असणारे गँरेजकडे घेवुन जात असताना विशाल झडे पुर्ण ( रा.वडेश्वर ता.मावळ जि पुणे) नाथा तळपे (रा. मंदोशी ता. खेड जि पुणे) सोमनाथ तुकाराम मोरमारे (रा. माऊ ता.मावळ जि पुणे) प्रविण पारधी (रा.राजपुर ता आंबेगाव जि पुणे) प्रदिप पारधी (रा.जांभोरी ता आंबेगाव जि पुणे) उमाबाई मते (रा. कोटमदरा ता. आंबेगाव जि पुणे) असे बिरसा ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते व आदिवासी विचारमंचाचे कार्यकर्ते यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवुन माझा रस्ता आडवुन “तुझा कातकरी समाज हिंदु नाही” असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना “माझा कातकरी समाज हिंदुच आहे” असे म्हणाले असता त्यांनी फिर्यादिस शिविगाळ, दमदाटी केली तसेच संघटनेच्या विरुध्द सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या बाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वायाळ करत आहे.
आंबेगाव : आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधत दोन गावात ग्रंथालय सुरू
आदिवासी संस्थेला डॉ. गोविंद गारे यांचे नाव देण्यात यावे – मधुकर पिचड