Friday, February 7, 2025

हॉकर्स झोन सर्वेक्षणात भ्रष्टाचार ? पथविक्रेत्या महिलांचे ‘फ’ प्रभागात ठिय्या आंदोलन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड मनपाने 1 नोव्हेंबर पासून सुरू केलेल्या पथ विक्रेते व फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणामध्ये ठेकेदार संस्था मार्फत पक्षपात केला जात आहे. चेहेरे पाहून पैसे घेऊन रात्री 10 वा.सर्वेक्षण केले जात आहे,त्यामुळे मूळ व्यावसायिकांची प्रामाणिकपणे नोंद होत नाही, असा आरोप पिंपरी चिंचवड हॉकर्स युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गणेश दराडे यांनी केला आहे.


मनपाच्या प्राधिकरण येथील ‘फ’ प्रभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युनियनच्या सदस्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करून फेर सर्वेक्षणाची मागणी केली आहे. पदाधिकारी अपर्णा दराडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व सुषमा इंगोले, निर्मला येवले, अमिन शेख, कल्पना मगर, भीमा खोत, सुभद्रा सरवदे, सुवर्णा उंडे, युवराज ढगे, किरण मेमाणे, डॉ.बाबासाहेब देशमुख याच बरोबर अनेक महिला उपस्थित होत्या.

Lic
Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles