औरंगाबाद,(३१जुलै) :औरंगाबाद जिल्ह्यात आज २३१ जणांना (मनपा १३०, ग्रामीण १०१) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १०,१९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण २८१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,१२३ झाली आहे. आजपर्यंत एकूण ४७५ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३४५६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर १३३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३५, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७० आणि ग्रामीण भागात १०० रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण (१०९)
रांजणगाव शेणपूजी (१), कन्नड (१), भराडी,सिल्लोड (१), वैजापूर (१), जरंडी, सोयगाव (२), पळशी (१), पैठण (१), अंबा, कन्नड (१), औरंगाबाद (१८), फुलंब्री (८), गंगापूर (१२), खुलताबाद (८), सिल्लोड (६), वैजापूर (१०), पैठण (१६), सोयगाव (२२)
सिटी एंट्री पॉइंट (३५)
न्यू म्हाडा कॉलनी (१), बजाज नगर (२), जय भवानी नगर (१), सावित्री फुले नगर (१), वडगाव (३), पडेगाव (१), सावंगी (१), आडगाव (२), बालाजी नगर (१), हर्सूल (१) चितेगाव (२), जाधववाडी (२), चेतना नगर (१), एन अकरा, यादव नगर (१), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (४), सोयगाव (२), खुलताबाद (१), आसेगाव (१), लिंबे जळगाव (१), वाळूज (२), गारखेडा (१), पैठण (२), चिकलठाणा (१) बीड बाय पास (१), अन्य (२)
मनपा हद्दीतील रुग्ण (१९)
एन सात सिडको (१), एन सहा सिडको (१), शिवशंकर कॉलनी (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), सन्नी सेंटर, पिसादेवी रोड (१), नवनाथ नगर, हडको (१), जालान नगर (१), चिकलठाणा (२), नंदनवन कॉलनी (१), बीड बायपास रोड (२), हनुमान मंदिराजवळ (१), मुलांचे वसतीगृह (२), टीव्ही सेंटर (१), देवळाई परिसर (१), शिवाजी नगर (१), एन नऊ सिडको (१), गुलमोहर कॉलनी, पडेगाव (२), एसआरपीएफ सातारा परिसर (१)
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बाजारसावंगीत ७१ वर्षीय पुरूष, पैठणमधील ९५ वर्षीय स्त्री आणि वैजापुरातील ६७ वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद, खराडी येथील ६५ वर्षीय स्त्री आणि शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यातील ६६ वर्षीय, वैजापुरातील ८१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.