Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोना बाधीतांची संख्या १ लाख १० हजार ७४४ वर; राजेश टोपेंचा...

कोरोना बाधीतांची संख्या १ लाख १० हजार ७४४ वर; राजेश टोपेंचा सूचक इशारा

(प्रतिनिधी):- कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गुणकाराच्या पटीने वाढतच आहे, राज्यात आज २ हजार ७८६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १ लाख १० हजार ७४४  अशी झाली आहे. तसेच आज नवीन ५ हजार ०६१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५६ हजार ०४९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. 

      तसेच राज्यात एकूण ५० हजार ५५४ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आज ट्विटरच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यावेळी त्यांनी मीच माझा रक्षक हा हॅश टॅग वापरून जनतेला तुम्हीच तुमचे रक्षक असल्याचा सूचक इशारा दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय