नवी दिल्ली : भारताच्या नव्या संसदेवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबत विरोधी पक्ष केंद्र सरकारवर निशाणा साधत असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या संसदेचे उद्घाटन करावे अशी मागणी केली जात आहे, या वादावर आज दिवसभर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसली.
नव्या संसदेचे उद्गाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी होणार आहे. मात्र यावर १९ विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेस आणि टीएमसीसह अनेक विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करावे अशी मागणी करत आहेत. या सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच देण्यात आले नसल्याची देखील माहिती समोर येत आहे. केंद्र सरकार लोकशाहीवर हल्ला करत असल्याचीही टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
या १९ पक्षांचा संसद उद्घाटनवर बहिष्कार
कांग्रेस, टीेएमसी, द्रविड मुन्नेत्र कड़गम (द्रमुक), जनता दल (यूनाइटेड), आम आदमी पार्टी, एनसीपी, शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन यूनियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ति मोर्चा, नेशनल कांफ्रेंस, केरल कांग्रेस (मणि), रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथिगल काट्ची (वीसीके), मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कड़गम (एमडीएमके) तसेच राष्ट्रीय लोकदल यांनी संसद उद्घाटनवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, 19 पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली असली तरी उद्घाटन कार्यक्रमात अनेक विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाने (YSRCP) संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची घोषणा केली.
हे ही वाचा :
WhatsApp ने आणले नवीन भन्नाट फिचर्स, तुम्हाला माहित आहे का ?
मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी
पुण्यात नोकरी शोधताय ? विविध शासकीय, निमशासकीय विभागात मोठी भरती
जसा गाडीचा, पिकाचा विमा घेतो; तसा स्वतः चा विमा हवाच ! आजच विमा काढून घ्या !
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती